श्री. अशोक नागपूरकर यांच्या तबियतीसंबंधीं वार्तापत्र

last updated 20130522
( ताजी माहिती  --  updated  bulletin )


शनिवार, दि. २०१३०४२७      दुपारीं डालसला पोंच़ले. डॉ. बंगाळे यांच़े घरीं (फ़ोर्ट् वर्थ मध्यें) निवास.

रविवार, दि. २०१३०४२८      Plano, Texas मध्यें श्री. बकुल दामले यांच्या घरीं. दिवसभर कांहीं तक्रार नाहीं. अशोकला खातांना बराच़ घाम फुटतो हें रात्रीं डॉ. बंगाळे यांच्या लक्षांत येतांच़ त्यांनीं
अशोकच्या पोटाच़ा कॅट्-स्कॅन् करण्याच़ें ठरविलें.

सोमवार, दि. २०१३०४२९     फ़ोर्ट् वर्थ् मधील हॅरिस् इस्पितळांत दाखल.

मंगळवार, दि. २०१३०४३०    कॅट्-स्कॅन् मध्यें कांहीं वैचित्र्य आढळलें नाहीं, परंतु CBC
मध्यें मात्र कांहीं elevated values दिसल्या (blood sugar, creatinin, potassium). म्हणून  . . .

बुधवार, दि. २०१३०५०१      angiography करण्यांत आलीत्यांत मात्र blocks सांपडले. Pretty severe.  तेव्हां heart-surgery करण्याच़ें ठरविण्यांत आलें आहे.  

शुक्रवार, दि. २०१३०५०३     सकाळीं ९ वाज़तां (CDT) अर्थात् संध्याकाळीं साडेसात वाज़तां (भा.प्र.वे.) surgery सुरूं होईल. बराच़ वेळ च़ालण्याची शक्यता.

                                           surgery actually सुरूं झ़ाली सुमारें ११ वाज़तां. (बहुधां इस्पितळाच्या scheduling problems मुळें हा उशीर झ़ाला असावा.) दोन-अडीच़ तासांपेक्षां कमीच़ च़ालली असावी. अगदीं सुरळीत झ़ाली असा सौ.रेखाताईंच़ा मला शुक्रवारीं दुपारीं निरोप आला.

शनिवार, दि. २०१३०५०४     आत्तां येथें मध्यरात्र उलटून शनिवार सुरूं झ़ाला आहे. आणखी आठदहा तासांनीं मीं रेखाताईंना फ़ोन करून हें वार्तापत्र update करण्याच़ा प्रयत्न करीन.


सोमवार, दि. २०१३०५०६     " काल साधारण एक दिवसभर थोडा अस्वस्थ होता (बहुधां कोठल्यातरी औषधांच़ा परिणाम असावा). आज़ मात्र कालपेक्षां बरीच़ सुधारणा आहे. एकदोन दिवसांत कदाचित् visitors नां परवानगी देतील. सौ.प्रिया उद्यां न्यू जर्सीमध्यें घरीं ज़ाईल; ती छोट्या मुलीला नवऱ्याज़वळ ठेवून आली आहे! "

बुधवार, दि. २०१३०५०८      सौ.रेखाताईंच्या मूळ प्लॅननुसार त्या दि.२०१३०५१२ च्या सुमारास भारतांत परत ज़ाणार होत्या. परंतु आतां त्यांना अधिक काळ येथें राहावें लागण्याची गरज़ भासणार आहे. (surgery नंतर पांच़एक दिवसांत discharge मिळेलसें जें वाटलें होतें तें लांबलें आहे. तसा व्हिसा वाढवून न मिळाल्यास सौ.रेखाताईंना कदाचित् च़ट्कन् भारताची एक सफ़र करून यावें लागेल.) "अशोक आज़ खुणेनें 'इथून घरीं कधीं ज़ायच़ें?' असें विचारत होता! आतां आज़ dialysis थांबविल्यावर ज़रा स्वस्थता वाढेलसें वाटतें."

गुरुवार, दि. २०१३०५०९     आज़ पुन्हां
dialysis मशीन सुरूं केलेलें दिसतें. पण अगदीं mild dialysis च़ालूं केला आहेसें दिसतें. काल त्यानें स्वतः थोडीतरी लघवी मिर्माण केलेली दिसली.  रेखाताईंनीं सौ.प्रियाला फ़ोन करून ही बातमी सांगितली.

त्याला ज़ो temporary(?) pace-maker बसविलेला आहे त्याच़ेऐवजीं permanent pace-maker उद्यां बसविण्याच़ा विचार आहे. (छोटेंसें surgical procedure.)

अशोकच़ें शुक्रवारीं जें operation झ़ालें तें triple-bypass surgery होतें असें आज़ मला समज़लें. (इतके दिवस ती open-heart surgery होती अशी माझी कल्पना झ़ालेली होती.)

रेखाताईंच़ा व्हिसा एक आठवड्याभरांत संपेल. पण आतां त्यांना तो extend करून घ्यावा लागेल. त्यासाठीं on-line application करण्याच़ा उद्योग आम्हीं आज़ सुरूं केला आहे.

शुक्रवार, दि. २०१३०५१०     मला तबियतींत फारशी सुधारणा दिसलेली नाहीं. पण कुधारणाही नाहीं. काल किंवा आज़ माझ्या बोलण्याला त्याच़ा कांहीं response मला ज़ाणवला नाहीं. कदाचित् झ़ोंपेंत अथवा गुंगींत असावा. पण डोळे मात्र अर्धवट उघडेच़ दिसतात. असो. आज़
ventilator (lung-machine) आणि mild dialysis च़ालूं आहेत.

त्याच़ा pace-maker बदलण्याच़ा विचार डॉक्टरांनीं तूर्त
पुढें ढकललेला दिसतो. ("आत्तांच़ा च़ांगला च़ालतो आहे, उगाच़ त्याला येथून -- ICU मधून -- शस्त्रक्रियागृहांत हलविण्याची तसदी कशाला द्यायची?" असें त्याच्या मुख्य शल्यविशारदांच़ें म्हणणें पडलें.)

रेखाताईंच्या visa extension application साठींच्या कागदपत्रांची ज़ुळवाज़ुळव आज़ पूर्ण झ़ाली. आतां रविवारच्या सुमाराला तें application e-file होईलसें वाटतें. (या कामासाठीं रेखाताई व मीं (माझ़ा लॅप्टॉप् घेऊन) इस्पितळांतच़ दुसऱ्या एका ज़ागीं ज़ाऊन बसतों. त्याच्याज़वळ रेखाताईंनीं बसून आत्तां तरी फारसा उपयोग नसतो. तो आपणांला response
देऊं लागल्यावर तसें बसण्याची गरज़ भासेल.)

शनिवार, दि. २०१३०५११     नुकताच़ मीं रेखाताईंशीं बोललों. "कालप्रमाणेंच़ माझ्या प्रश्नांना
किंवा विधानांना तोंडाची हालच़ाल करून, डोळ्यांची थोडी हालच़ाल वगैरे करून प्रतिसाद देतो आहे." यावरून काल मला दिसला त्यापेक्षां आज़ रेखाताईंना अधिक प्रतिसाद दिसला आहे. आज़ रेखाताईंना पुन्हां कॅथेटरच्या नळीमध्यें आणखी नवी लघवी दिसली आहे. आज़ दुपारीं वगैरे मीं भेंटेनच़.

रविवार, दि. २०१३०५१२        आज़ मलासुद्धां सुधारणा स्पष्ट दिसली. हाताच्या पकडीवाटें, डोळ्यांवाटें, माना हलवून वगैरे उत्तम प्रतिसाद देत होता. "सर्व पुणें तुझ्यामागें उभें आहे" असें सांगितल्यावर हंसलासें वाटलें.

सोमवार, दि. २०१३०५१३      आज़ दुपारच्या सुमारास डायॅलिसिस् मशीन (त्यांतील filters clog झ़ाले म्हणून) disconnect केलें होतें. रात्रीं १० च्या सुमारास रेखाताईंना heart rate ४८ पर्यंत कमी झ़ालेला दिसला. मीं इस्पितळांत पोंच़ल्यानंतर तासाभरांत डॉ.नेऊरगांवकर यांनीं च़ौकशी केली, व काय आणि कां घडलें तें रेखाताईंना समज़ावून सांगितलें. (हृदयाला encouragement देणारें एट्रोपीन, किंवा तश्याच़ कांहीं नावाच़ें -- औषध बंद केल्यामुळें heart rate कमी झ़ाला असावा ...) एट्रोपीन् पुन्हां सुरूं केलें, थोड्या वेळानंतर heart rate पुन्हां वाढला
इ. इ.

मंगळवार, दि. २०१३०५१४     सर्व parameters पूर्ववत् होण्याच्या मार्गावर आहेत.

बुधवार, दि. २०१३०५१५       सोमवार रात्रीची घबराहट आतांपावेतों निवळलेली दिसते. आज़ सकाळीं मलासुद्धां alertness मध्यें निश्चित सुधारणा दिसली. डोळ्यांची हालच़ाल, मान हलविणें, ओंठांची हालच़ाल करण्याच़ा थोडा प्रयत्न, इ. प्रतिसाद दिसले. अमोनियाच़ें प्रमाणही आज़ कमी झ़ालें आहे. सुधारलेला प्रतिसाद हा त्याच़ाच़ परिणाम असावा ... ("लिव्हरच़ें कार्य सुधारलें असण्याच़ें हें लक्षण असूं शकतें ...")

आज़ कदाचित्
(ज्याच़ा विचार शुक्रवार दि.२०१३०५१० रोजीं पुढें ढकलला होता, तो) कायमस्वरूपी pace-maker घालण्याच़ें पुन्हां ठरवितील.

बुधवार, दि २०१३०५१५ संध्याकाळ   कायमस्वरूपी pace-maker घालण्याच़ें पुन्हां पुढें ढकललें गेलें आहे. कारण :  "आधीं कोणतेंतरी (किरकोळ?
fungal?) infection पूर्णपणें घालविल्यावर तें काम करतां येईल.

शुक्रवार, दि. २०१३०५१७  अशोकची मुलगी सौ.प्रिया, ज़ांवई Martin, व छोटी मुलगी असे तिघेज़ण काल पहांटें न्यूजर्सीहून येथें अशोकला भेंटण्यासांठीं आले आहेत. तीनचार दिवस राहतील असें रेखाताई म्हणाल्या. वादळी हवामानामुळें त्यांच़ें विमान बुधवारीं रात्रीं दहा वाज़तां पोंच़ण्याऐवजीं गुरुवारीं पहांटें तीनसाडेतीनला येथें आलें.

शुक्रवार, दि. २०१३०५१७ दुपार  
आज़ surgery करून आणि ICU मध्यें दाखल होऊन दोन आठवडे पूर्ण झ़ाले.

आज़ छोटी नातसुद्धां अशोकला भेंटली.

"Fungal infection (रक्तामध्यें) confirm झ़ालें आहे" असें सौ.रेखाताई म्हणाल्या.
त्यांची मैत्रीण  'सुधामावशी' सुद्धां न्यूयॉर्कहून आली आहे. अशोकच़े मूत्रपिंड (kidneys) कार्यरत झ़ाल्याच़ें अज़ून स्पष्ट चिन्ह नाहीं.  Dialysis  च़ालूंच़ आहे. रेखाताई व प्रिया आज़ nephrologist ला भेंटतील. ... सर्वज़ण encouraging बदलांची वाट पाहात आहेत.

स्वतः उद्यां तीनएक दिवसांसाठीं बाहेरगांवीं (न्यू जर्सी मध्यें) ज़ाण्याआधीं मीं आज़ संध्याकाळीं पुन्हां एकदां इस्पितळांत भेंट देण्याच़ा प्रयत्न करीन, आणि काय दिसतें तें कळवीनच़.

शनिवार, दि २०१३०५१८    रेखाताई : "आज़ डोळ्यांची, चेहऱ्याची, व एकूणच़ शरीराची हालच़ाल अधिक expressive दिसते आहे. डोळेहि कमी निस्तेज दिसताहेत. आज़ केवळ शारीरिक हालच़ालींच्या साह्यानें -- तोंडानें कांहींहि बोलतां आलें नाहीं तरी -- त्यांनीं several विचार माझ्यापर्यन्त पोहोंच़विले!"

मंगळवार, दि २०१३०५२१   आज़ सकाळींसुद्धां अशोकच़ें रेखाताइंशीं वैचारिक दळणवळण बरेंच़ समाधानकारक झ़ालें. परंतु दुपारीं dialysis machine काढावें लागलें, कारण "He is not tolerating it."  त्या
मशीनच़े filters सुद्धां पुन्हां clog झ़ाले होते! आणि अशोकच्या रक्तांतील इन्फेक्शन् ज़ात नसल्यामुळें डॉक्टर मंडळी चिंतातुर आहेत. एकूण, medically encouraging बातमीच़ा अज़ूनपर्यन्त अभावच़ ज़ाणवतो आहे.

बुधवार, दि २०१३०५२२   कळविण्यास दुःख होतें कीं, अनेक शारीरिक व्याधींशीं, २३ दिवसांहून अधिक काळ, gutsy लढा देऊनहि, श्री. अशोक नागपूरकर याच़ें, आज़ पहांटें निधन झ़ालें.

ICU मध्येंच़ झ़ालेल्या निधनाची स्थानिक वेळ पहांटें ३ वाज़ून ५५ मिनिटें (अर्थात् भा.प्र.वे. बुधवार दुपारीं २ वाज़ून २५ मिनिटें) होती असा निष्कर्ष
(वेगवेगळ्या recorded parameters च्या अभ्यासावरून) डॉक्टरांनीं काढला. (मृत्यूच़ें कारणः multiple organ failure, and cardiac arrest.) शेवटले अनेक तास रेखाताई व येथील सर्व नातेवाईक अशोकच्या ज़वळच़ होते. या प्रमुख नातेवाइकांच्या उपस्थितींतच़ हा निष्कर्ष रेखाताईंना सांगण्यांत आला. रेखाताई या खडतर प्रसंगाला मोठ्या धीरानें तोंड देत आहेत.

अंत्यविधि व दहनविधि उद्यां, गुरुवार दि २०१३०५२३ रोजीं, सकाळीं (भा.प्र.वेळेनुसार गुरुवार संध्याकाळ) होईल. त्याआधींच़
अशोकची मुलगी न्य़ूजर्सीहून येथें पोंच़लेली असेल. 

या प्रसंगीं कोणाला कांहीं संदेश पाठवावयाच़े असल्यास ते पुढील पत्त्यावर त्वरित पाठवावेत, म्हणज़े अंत्यविधीप्रसंगीं त्यांच़ें वाचन करितां येईल:  bangale@aol.com

भारतांतील मंडळींना मराठींत संदेश पाठविण्याची इच्छा असूनहि तसा पाठविण्याचें कसब अवगत नसेल, तर असे संदेश सौ. जया ज़ोगळेकर यांना
फ़ोनद्वारां तोंडीं कळविले तरी च़ालेल; विधीच्या आधीं मीं असे सर्व संदेश तिच्याकडून मिळविण्याच़ा प्रयत्न करीन. जयाच़ा फ़ोनः (२०)२५४२-४०५४, अथवा ७३५०१-८९८८६).

हें वार्तापत्र गरज़ेनुसार वरच़ेवर update करण्यांत येईल.

Go Back to bindhast : home