परिशिष्ट  चौथें


सिद्धांच्या  संघाचा  चित्रपट


पृथ्वीवर ज़ो जीवन्मुक्तांच़ा संघ हल्लीं अस्तित्वांत आहे, त्याच़ा नकाशा खालीं देत आहोंत. या जीवन्मुक्तांविषयीं बरीच़ माहिती प्रस्तुत पुस्तकांत पूर्वीं येऊन गेलेली आहे. त्यांच्या संस्थेची साकल्यानें कल्पना यावी यासाठीं पुढील चित्रपट देत आहोंत. या संस्थेंतील अधिकार दीक्षेवर अवलंबून असतो. जितकी जास्त उच्च दीक्षा पुरुषानें घेतली असेल, त्या मानानें त्याच़ा या संघांतील अधिकार मोठा असतो. पुढील पटांत डाव्या हातास दीक्षेच़ा क्रमांक व त्या दीक्षेच़ें नांव अशीं दिलेलीं आहेत.

महादीक्षेच़ा  अनुक्रम
व  संज्ञा

सिद्धांच़ा  संघ

नववी; कुमार
सनत्कुमार
(सर्व भूगोलाच़े अधिपति व ईश्वराच़े पृथ्वीवरील प्रतिनिधि)
आठवी; प्रत्येक-बुद्ध
सनक; सनंदन; सनातन;       (पूर्वींच़े गौतमबुद्ध)सातवी; महाचोहण
मनु
(भगवान्
 वैवस्वत
     व चाक्षुष)     
 बोधिसत्त्व किंवा
जगद्गुरु
(भगवान्
 मैत्रेय)
महाचोहण
                                                (यांच़ें नांव ग्रंथान्तरीं सांपडत नाहीं)                                              


सहावी; चोहण
किरण १ लें
राजकारण
  ऋषि मौर्य 
किरण २ रें
धर्म व शिक्षण
ऋषि कुठूमी 
किरण ३ रें
चतुरस्रता
ऋषि व्हेनेशियन्
किरण ४ थें
ललितकला
ऋषि सेरपिस्
किरण ५ वें
भौतिकशास्त्र
ऋषि हिलारियन्
किरण ६ वें
भक्ति
ऋषि जीझ़स्
किरण ७ वें
विधि-संस्कार
ऋषि सेन्ट् जर्मेन्
पांच़वी; सिद्ध, मुक्त
मुक्त पुष्कळ आहेत, त्यामुळें येथें त्यांच्या नांवांच़ा उल्लेख केलेला नाहीं.
च़ौथी; परमहंस
तिसरी; हंस
दुसरी; कुटीचक
पहिली; बहूदक
हे सर्व शिष्य होत.


सनत्कुमार हे या संघांतील सर्वश्रेष्ठ अधिपति आहेत व त्यांनीं नववी महादीक्षा घेतलेली आहे. त्यांच़े खालीं एक पायरी आलें कीं, त्या भूमिकेवर सनक, सनंदन व सनातन असे तीन कुमार येतात. यांस बुद्ध धर्मांत प्रत्येक-बुद्ध म्हणतात. सद्यां सिद्धसंघांत एक विदेहमुक्त पुरुष या पायरीवर आहेत. पूर्वीं त्यांनीं 'व्यास' म्हणून जन्म घेतलेला होता व त्यानंतर ते गौतमबुद्ध म्हणून जन्म घेऊन आले. ते विदेहमुक्त असल्यामुळें त्यांच़ें नांव कंसांत घातलें आहे. त्याखालील दीक्षा म्हणजे 'महाचोहणांची दीक्षा' असें म्हटलें तर च़ालेल. ही सातवी महादीक्षा घेतलेले तीन अधिकारी सिद्धसंघांत आहेत. मनु, बोधिसत्त्व व महाचोहण अशीं त्या तिघांचीं नांवें आहेत. सध्यां त्या अधिकारांच्या ज़ागांवर जे पुरुष आहेत त्यांचीं नांवें कंसांत दिलीं आहेत. मानवांच्या विकासाच़े एकंदर सात मार्ग आहेत. येथें त्या मार्गांना 'किरण' असें म्हटलें आहे. किरण म्हणजे विशिष्ट मनोरचना किंवा विकासाच़ा एक विशिष्ट मार्ग असें म्हणतां येईल. मनु हे पहिल्या किरणाच़े व बोधिसत्त्व हे दुसऱ्याच़े असतात. महाचोहण हे ३ ते ७ पर्यंतच्या किरणांवर आधिपत्य च़ालवितात. सहाव्या महादीक्षेच़े जे पुरुष असतात त्यांस चोहण म्हणतात. हे सात असतात व एकेक प्रत्येक किरणाचा अधिकारी असतो. हल्लीं या किरणांच़े कोण कोण अधिकारी आहेत त्यांचीं नांवें पटांत त्या त्या किरणाखालीं दाखविलीं आहेत. पांचवी महादीक्षा म्हणजे मुक्ति पावलेले पुरुष जी घेतात ती. त्यांच्या खालच्या १ ते ४ पर्यंतच्या दीक्षा घेणारा माणूस शिष्य म्हणून सिद्धसंघांत ओळखला ज़ातो. थिओसॉफ़िकल् सोसायटींतील कांहीं पुढारी या खालच्या शिष्यांच्या पायऱ्यांवर होते व आहेत. सिद्ध संघांतील सर्व अधिकारी सदेहमुक्त असतात, अर्थात् त्यांनीं जडदेह धारण केलेला असतो. वरील पटांत फक्त गौतमबुद्धांखेरीज़ अन्य कोणा विदेहमुक्ताच़ा उल्लेख आम्हीं केलेला नाहीं. जगदंबा ही व्यक्तिहि विदेहमुक्त आहे. तिच़ा दर्जा माहीत नसल्यामुळें वरील चित्रपटांत तिच़ा समावेश केलेला नाहीं.  *  *  *  *  *

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका