परिशिष्ट  तिसरें


दीक्षांचीं  नांवें


प्रस्तुत पुस्तकांत ज्या महादीक्षांच़ें वर्णन आलें आहे त्याला हिंदु धर्मांत व बौद्ध धर्मांत नांवें दिलेलीं आहेत. तीं या पुस्तकांत मागें आम्हीं नमूद केलीं आहेत.  ख्रिस्ती धर्मांतील ख्राइस्ट्-चरित्रामधील टप्पेहि या महादीक्षांच़े सूचक आहेत. वाचकांच्या सोयीकरितां हीं सर्व नांवें एकत्र करून पुढें दिलीं आहेत :--


थिऑसफ़ीय  नांव

हिंदु  नांव

बौद्ध  नांव

ख्राइस्ट्  चरित्रांतील  टप्पे

The Fist Great Initiation
(पहिली महादीक्षा)

बहूदक

स्रोतापन्न
Birth Under the Star
or Virgin Birth
The Second Great Initiation
(दुसरी महादीक्षा)

कुटीचक

सकृदागमी

Baptism

The Third Great Initiation
(तिसरी महादीक्षा)

हंस

अनागमी

Transfiguration

The Fourth Great Initiation
(च़ौथी महादीक्षा)

परमहंस

अर्हत्
Passion  किंवा Crucifiction
and Resurrection

The Fifth Great Initiation
(पांच़वी महादीक्षा)

मुक्त, सिद्ध,
अतीत


अशेख

Resurrection & Ascention किंवा

Ascention & Descent of the Holy Grailवरील संस्कृत नांवांत व इतर ग्रंथांत दिलेल्या संस्कृत नांवांत फेर सांपडण्याच़ा संभव आहे. उदाहरणार्थ, डॉ.बेझ़ंट्कृत The Path of discipleship या पुस्तकांत पहिल्या महादीक्षेच़ा संस्कृत पर्यायशब्द वरीलप्रमाणें 'बहूदक' न देतां 'परिव्राजक' असा दिला आहे. आणि बाकीच्या संज्ञा वर दिल्याप्रमाणें आहेत. या सर्व संज्ञांस श्रीमत् शंकराचार्यांच्या ग्रंथांच़ा आधार आहे असें डॉ. बेझ़ंट् यांनीं म्हटलें आहे. श्री. सी. जिनराजदास यांच्या The First Principles of Theosophy या पुस्तकांत बहूदक ही दुसऱ्या महादीक्षेची संज्ञा व कुटीचक ही पहिल्या महादीक्षेची संज्ञा असें दिलेलें आहे. पण श्री. जिनरासदास यांनीं (१९२८ ची च़ौथी आवृत्ति पृ.२२४) असें म्हटलें आहे कीं, या संस्कृत संज्ञा बहुधा त्या त्या दीक्षांच्या पर्यायसंज्ञा असाव्यात. पण त्या नक्की बरोबर आहेत असें त्यांनीं म्हटलेलें नाही. ख्रिस्ती संज्ञांसंबंधानेंहि अशीच़ अनिश्चितता सांपडणें शक्य आहे.

'संन्यास' नांवाच़ा एक नाना टप्प्यांच़ा मार्ग आहे ही गोष्ट आज़ फारशी कोणाला माहीत नाहीं. तुरीयातीतोपनिषदामध्यें 'क्रमेण कुटीचको बहूदकत्वं प्राप्य बहूदको हंसत्वमवलंब्य हंसः परमहंसो भूत्वा इ.' असें म्हटलें आहे. तेव्हां कुटीचक, हंस, परमहंस या एका पुढच्या एक पायऱ्या आहेत हें उघड आहे. भिक्षुकोपनिषद् , संन्यासोपनिषद् (१२,१३), नारदपरिव्राजकोपनिषद् (पंचमोपदेश व सप्तमोपदेश पहा) यांत कुटीचक, बहूदक वगैरे नांवें असणाऱ्या संन्याशांचीं वर्णनें आहेत. पण तीं प्रायः बहिरंगांचीं वर्णनें आहेत. म्हणजे कोणाला जानवी, दंड कमंडलु वगैरे असतात, कोणाला नसतात, कोण कोठें, किती दिवस राहील, काय अन्न खाईल, किती वेळां स्नान अगर क्षौर करील वगैरेची माहिती आहे. तसेंच़ श्रवणाच़ा अधिकार कोणाला, जपाच़ा कोणाला, दुसऱ्यास शिकविण्याच़ा अधिकार कोणाला, अशीहि माहिती आहे. या गोष्टी देश-काल-वर्तमानानुसार बदलण्यासारख्या आहेत हें कोणासहि समज़ेल. अर्थात् या तपशिलावरून इंग्रजी संज्ञांच़े पर्यायशब्द नक्की कोणते तें सांगतां येणार नाहीं, पण संन्यास मार्गावर कमी अधिक अधिकाराच़े टप्पे दर्शविणाऱ्या कुटीचक बहूदकादि संज्ञा आहेत याविषयीं शंका घेण्याच़ें कारण नाहीं. तसेंच़, या संज्ञा निरनिराळ्या दीक्षांच्या दर्शक आहेत हेंहि निर्विवाद आहे; कारण पहिल्या महादीक्षेच़ा अधिकारी शिष्य भुवर्लोकांतल्या व्यवहारांत निपुण असतो, दुसऱ्या महादीक्षेच़ा अधिकारी स्वर्लोकांतल्या व्यवहारांत निपुण असतो वगैरे माहिती या पुस्तकांत पूर्वीं आलेली आहे. संन्यासमार्गीयांच्या टप्प्यांविषयीं कुटीचकाच़ा भुवर्लोक असतो, बहूदकाच़ा स्वर्ग लोक असतो, अशीं विधानें संन्यासोपनिषदांत (५९) व नारदपरिव्राजकोपनिषदांत (पंचमोपदेश) आढळतात. तेव्हां या संज्ञा दीक्षांच्या दर्शक आहेत हें उघड आहे. या दीक्षांसंबंधाची बरीच़ माहिती अलीकडे थिऑसफ़ीय वाङ्मयांत  प्रत्यक्ष अनुभवावरून देण्यांत आलेली आहे. हा विषय ज़ुन्या काळीं तितका उघड बोलण्याच़ा नसल्यामुळें ज़ुन्या ग्रंथांतून वरील संज्ञांची तपशीलवार व सविस्तर माहिती मिळण्यास अडच़ण पडते. तशी माहिती सांपडती तर नव्या ज़ुन्या माहितीवरून कोणत्या नव्या संज्ञेस कोणती ज़ुनी पर्यायसंज्ञा त्या ग्रंथांनीं दिली आहे याच़ा निर्णय करणें सोपें झ़ालें असतें. पण ज़ुन्या ग्रंथांतील माहिती तुटपुंजी असल्यामुळें ज़ुन्या संज्ञांसंबंधानें अनिश्चितता रहाणें अपरिहार्य आहे. ज़ुन्या ग्रंथांतहि हे टप्पे दिलेले असून त्यांस वेगवेगळीं नांवें त्यांनीं दिलीं होतें इतकें ज़री आमच्या वाचकांस पटलें तरी पुष्कळ आहे.  *  *  *  *  *

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका